आंदर मावळातील ग्रामीण भागात दळणवळणाला गती मिळावी यासाठी वडेश्वर-कशाळ-ठोकळवाडी धरणालगत काम सुरु असलेल्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले. सदर रस्ता आठशे मीटर लांब आणि साडेपाच मीटर रुंद होणार असून यासाठी एकूण 95 लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळमधील नदीवरील पूल, रस्ता रुंदीकरण, नवीन रस्ता करणे यासाठी एकुण 46 कोटी 96 लक्ष रुपयांची विविध विकासकामे सध्या वेगाने सुरू आहेत. ग्रामीण भागातील गावांना जोडणारे अंतर कमी व्हावे यासाठी वडेश्वर- कशाळ – ठोकळवाडी धरणालगत असलेल्या पुलाचे काम देखील प्रगती पथावर असून लवकरच हा पुल वाहतूकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे आंदर मावळातील दोन भागात विभागलेल्या गावांच्या दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे. दरम्यान, यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळासह मावळ तालुक्यातील विकासकामांची घौडदौड येणाऱ्या काळात देखील अशीच सुरु ठेवण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. ( Andar Maval Vadeshwar Kashal Thokalwadi Road Bhumi Poojan )
या भुमिपुजन प्रसंगी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, मा.चेअरमन नारायण मालपोटे, कल्हाट सरपंच शिवाजी करवंदे, माजी सरपंच बळीराम भोईरकर, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस दिगंबर आगिवले, माजी उपसरपंच तुकाराम जाधव, मा. सरपंच विठ्ठल जाधव, शरद जाधव, अनिल जाधव, प्रशांत जाधव, सोमनाथ जाधव, नवनाथ जाधव, दत्ता जाधव, सुदाम ठाकर, गोरख पिंगळे, रोशन पिंगळे, मारुती करवंदे, वैभव पिंगळे, उत्तम शिंदे, मारुती जाधव, नंदू मदगे, मंगेश जाधव, नंदाराम जाधव,देविदास धनवे, छबू वाईकर, सुभाष पिंगळे,भरत जोरी, संतोष जाधव, मच्छिंद्र जगताप, सुभाष मा. जाधव, तानाजी शिंदे,शंकर जाधव आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘रयत विद्यार्थी विचार मंच’कडून परंदवडी गावात गरीब – कष्टकरी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी
– जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन : महिलांनी काळ्या साड्या नेसून दिल्या मंत्री सुरेश खाडेंना भाऊबीजेच्या शुभेच्छा
– अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला! पवन मावळात बनणार पर्यटनाचा नवा ‘राजमार्ग’, आमदार शेळकेंकडून भूमिपूजन