ब्राम्हणोली येथील अंकुश रामचंद्र काळे यांची पवनमावळ भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वडगाव मावळ येथे भाजपा पक्ष कार्यालयात मावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी अंकूश काळे यांना निवडीचे पत्र दिले. ( Ankush Kale Appointed as Pavan Maval BJP Social Media President )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ब्राम्हणोली येथील अंकुश काळे हे मागील अनेक वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत. युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या मागे तरुणांची खुप मोठी ताकद आहे. त्यांचे कुटुंब देखील अनेक वर्षांपासून भाजपाशी एकनिष्ठ आहे. अंकुश काळे सध्या ब्राम्हणोली येथील जय हनुमान ढोल मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच पथकाच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम देखील राबवत असतात. यासह पवनमावळ मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षे कुस्ती स्पर्धा आयोजित करुन नवनवीन तरुण मल्ल घडवण्यासाठीच्या प्रयत्नांमुळे त्यांचा पवनमावळमधील तरुणांशी चांगला जनसंपर्क आहे.
अंकूश काळे यांच्या याच कार्याची नोंद घेऊन पक्षाने त्यांच्यावर नवी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे.
अधिक वाचा –
आमदार शेळकेंच्या उपस्थितीत सोनू काळे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठी जबाबदारी!
व्हिडिओ: भाजपाकडून कामशेत शहरासाठी नव्या नियुक्त्या, पाहा संपूर्ण यादी