Dainik Maval News : राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारिख ही 29 ऑक्टोबर आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघात इच्छूक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल कऱण्यासाठी घाइ करीत आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक कार्यालयातकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि. 25) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसअखेरपर्यंत एकूण तीन उमेदवारांनी एकूण सात नामनिर्देश अर्ज दाखल केले आहेत. मावळ विधानमतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी ही माहिती दिली. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास 22 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली असून यात आतापर्यंत 16 उमेदवारांना उमेदवारी अर्जाची विक्री करण्यात आली आहे.
ज्या तीन उमेदवारांनी आतापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, त्यात विद्यमान आमदार सुनिल शंकरराव शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), बापू जयवंत भेगडे (अपक्ष) आणि गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष/ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार / शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा समावेश आहे. शुक्रवारी गोपळा तंतरपाळे यांनी अपक्षासह एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल केले.
सुनील शेळके यांनी एकूण दोन अर्ज दाखल केलेत, तर गोपाळ तंतरपाळे यांनी एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तंतरपाळे यांनी अपक्ष तसेच महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांच्या वतीने प्रत्येकी एक असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर बापू भेगडे यांनी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बापूसाहेब भेगडे हे येत्या सोमवारी, 28 ऑक्टोबरला देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ विधानसभेत मतदार जनजागृती अभियान, विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यात भात कापणीला सुरूवात ; परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज
– दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या ; पणत्या, कंदील, फटाके आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग । Diwali News