Dainik Maval News : वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी या जागेवर सामाजिक वनीकरण सातारा येथून सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी वरक यांच्याकडे शिरोता वनपरिक्षेत्र कार्यालयाचा सध्या अतिरिक्त कार्यभार होता, तो कार्यभार ताकवले यांनी स्वीकारला आहे.
सोमनाथ ताकवले यांनी यापूर्वी वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयात 5 वर्ष सेवा केली आहे. वडगाव मावळ वनपरिक्षेत्रात काम करत असताना त्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पारवडी रोपवाटिकेत रोप निर्मितीचे उल्लेखनीय काम केले होते. तसेच दोन ठिकाणच्या बिबट मादी पिलांचे पुनर्मिलनाचे यशस्वी काम केले होते.
रानडुक्कर शिकारी, वणवा लावणारे आरोपी यांना पकडणे आणि आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करणे यांसह टायगर पॉईंट – लायन्स पॉईंट येथील वन पर्यटनातून विविध विकासकामे त्यांनी केली आहेत. वनविभागात विविध योजना अंतर्गत जल व मृदूसंधारण काम केली. सोबत आताही सातारा येथे सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असताना उल्लेखनीय काम केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण, मावळमधील धक्कादायक प्रकार
– सोमाटणे फाटा येथे पाच किलो गांजा सह एकाला अटक, तळेगाव पोलिसांची कारवाई । Talegaon Crime
– संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ; यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय