Dainik Maval News : कार्ला येथील शेतकरी अशोक (तात्या) खंडू हुलावळे (वय ५५ वर्षे, रा. कार्ला ता. मावळ) हे घरात कुणालाही न सांगता घर सोडून गेले आहे. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
अशोक हुलावळे तीन महिन्यांपासून कार्ला येथून बेपत्ता असून ते हरविल्याची तक्रार सुभद्रा अशोक हुलावळे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. अशोक हुलावळे हे पाच फूट उंच असून अंगात काळी पॅन्ट व पांढरा शर्ट असा वेष त्यांनी परिधान केला असून ते मराठी, हिंदी भाषा बोलू शकतात, असे तक्रारीत नमूद आहे.
सदर व्यक्ती कुठेही आढळून आल्यास ८४१२०५७६७५ किंवा ९३५९५४३६८४ क्रमांकावर तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई