मावळ विधानसभेचे ( Maval Vidhansabha ) विद्यमान आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांचे बंधू प्रसिद्ध उद्योजक सुधाकर शेळके ( Sudhakar Shelke ) यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ( Atrocity Case Filed ) करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सुधाकर शेळके आणि मॉन्टी दाभाडे (दोघे रा. तळेगाव दाभाडे Talegaon Dabhade ) यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 3 (1) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रवीण सिद्धार्थ ओव्हाळ (वय 36, रा. तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लिंब फाटा येथे ही घटना (शनिवार, 10 सप्टेंबर) घडली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुधाकर शेळके यांनी फेटाळले सर्व आरोप…
सुधाकर शेळके यांनी त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप फेटाळला असून राजकीय आकसापोटी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय बदनामी करण्यासाठी माझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी नोंदवण्याचे कारस्थान विरोधकांकडून केले जात आहे. तसेच पोलीस चौकशीत खरे काय ते सिद्ध होईल, असेही सुधाकर शेळके म्हणाले. ( Atrocity Case Filed Against Sudhakar Shelke Brother of Maval MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
लोणावळ्यात शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला! खुन्नसने हल्ला झाल्याचा वडीलांचा आरोप
लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण