Dainik Maval News : वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांभूळ फाटा ते जांभूळ गावाच्या मार्गावर गुरुवारी (दि. 22 ऑगस्ट) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. येथून पायी जात असलेल्या एका महिलेला धक्का मारून तिचा गळा आवळून मोबाइल चोरीचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या नेहमीच्या मार्गाने पायी जात होत्या. तेव्हा स्मशानभूमीजवळ एकट्या असलेल्या या महिलेवर आरोपी दत्ता वाघमारे याने अचानक हल्ला केला. दत्ता वाघमारे याने महिलेचा गळा दाबून तिच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. महिलेने घाबरून आरडाओरडा केला. तेव्हा त्या मार्गावरून दुचाकीवरून जात असलेला एक व्यक्ती मदतीला धावला. ( Attempt to steal mobile phone by strangling woman serious incident in Vadgaon Maval Police limits )
तो मदतीला आल्याने घाबरलेला आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. हा प्रकार इथेच थांबला नाही तर, आरोपीचा भाऊ गणेश वाघमारे हा हातात कोयता घेउन घटनास्थळी धावून आला. त्याने फिर्यादी महिला आणि तिच्या मदतीला आलेल्या व्यक्तीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर गणेश वाघमारे याने दत्ता वाघमारे याला घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केली.
पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी दत्ता वाघमारे आणि गणेश वाघमारे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 134, 309 (5), 351 (2), 352 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी गणेश वाघमारे यास अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने ग्रामीण भागातील महिला, मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अधिक वाचा –
– ‘होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन’कडून आंदर मावळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाचे धडे । Maval News
– मोठी बातमी ! पवनमावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 99 टक्के भरले, 1400 क्युसेक विसर्ग सुरू
– कामशेत पोलिसांची मोठी कारवाई, 98 किलो गांजासह 56 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत