आतवण – आपटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन मारुती कुमा टाकवे ह्यांचे शुक्रवारी (दिनांक 28 जुलै) रोजी दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
कै मारुती टाकवे हे मागील 15 वर्षांपासून आपटी सोसायटीचे संचालक – चेअरमन म्हणून कार्यरत होते. तसेच कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सहकाराची पेरणी केली होती. शुक्रवारी त्यांच्या निधनाची माहिती समजताच संपूर्ण पंचक्रोशीतून शोक व्यक्त होऊ लागला. वयाच्या 83 व्या वर्षी मारूती टाकवे ह्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज (शनिवार, दिनांक 29 जुलै) रोजी राहत्या गावी आतवण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
मारुती टाकवे ह्यांच्या पश्चात पत्नी 2 हिराबाई मारुती टाकवे आणि सखुबाई मारूती टाकवे, मोठी मुलगी कलाबाई संपत कडू, लक्ष्मण मारुती टाकवे, अंकुश मारुती टाकवे, लहू मारूती टाकवे, संगीता भाऊ ढोरे, अंजना राम बोडके, विठ्ठल मारुती टाकवे, शिवाजी मारूती टाकवे, अलका मोहोळ, भिवा मारुती टाकवे असा मोठा परिवार आहे.
‘सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि सर्वांवर माया लावणारे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आपल्यातून हरवले. त्यांच्याकडून नेहमीच काहीना काही शिकायला मिळाले. सोसाटीच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी अनेक चांगली कामे केली. त्यांच्या निधनाचा धक्का बसला असल्याची’ प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते संतोष कडू ह्यांनी दैनिक मावळला दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News
– हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या, खासदार श्रीरंग बारणेंची केंद्रीय रसायन मंत्र्यांकडे मागणी
– युवकांनो सावधान..! सोशल मीडिया मार्केटिंगच्या बहाण्याने तरूणाला 11 लाखांचा गंडा; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार