Dainik Maval News : सध्या राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यंदा विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती मावळ मार्फत मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि शिक्षक वर्गाने तळेगाव येथील मॉल्स, दुकाने याठिकाणी कर्मचारी व ग्राहकांना मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक मतदाराने आपले बहुमूल्य मत देऊन लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.
बचत गटातील महिलांमध्ये जागृती
मावळ विधानसभा क्षेत्रातील इंदोरी येथील महिला बचत गटाला भेट देऊन येथील महिला गटाच्या सर्व सदस्य महिलांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. मतदारांनी देखील शंभर टक्के मतदान करणार असल्याचा संकल्प केला. यावेळी नोडल अधिकारी भगवंता बनकर उपस्थित होत्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभेतील उमेदवारांना खर्च निरिक्षकांच्या नोटीसा ; खर्चाचे अपूर्ण सादरीकरण केल्याने नोटीस । Maval Vidhan Sabha
– मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बसचा अपघात ; बसमधील २६ प्रवासी जखमी
– शिरगावातील श्री साई मंदिर परिसरात मतदार जनजागृती अभियान, मावळ पंचायत समितीचा उपक्रम । Maval Vidhan Sabha