परंदवडी (ता. मावळ) गावच्या माजी आदर्श सरपंच सुलभा कुंदन भोते यांना त्यांच्या वैशिष्ट्येपुर्ण कामगिरीसाठी 2023 सालचा ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच’ पुरस्कार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नवी दिल्ली इथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. 2022 साली सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर सुलभा भोते यांनी अनेक विधायक कार्ये गावात केली होती. गावाचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी केलेल्या पायाभूत कामांच्या जोरावर त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा हा सन्मान असल्याचे सुलभा भोते यांनी दैनिक मावळसोबत बोलताना सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सुलभा भोते यांचा अल्पपरिचय –
संपूर्ण नाव – सौ. सुलभा कुंदन भोते
माजी सरपंच ग्रामपंचायत परंदवडी (ता. मावळ, जि. पुणे.)
2022 साली सरपंच पदी निवड झाल्यानंतर कार्यकाळात गावात अनेक पायाभूत सुविधांची कामे सुरू केली. त्यात,
1) जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेच्या कामांना गती दिली.
2) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गावातील गरजू लोकांना घरकुल उपलब्ध करून दिले.
3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी ISO करण्यात योगदान.
4) इंदिरा कॉलेजच्या CSR फंडामार्फत अंगणवाडीचे वॉल कंपाऊंड करण्यात पुढाकार.
5) परंदवडी स्मशानभूमीच्या परिसरात झाडे व लोखंडी कंपाऊंड केली.
6) परंदवडी गावात अंतर्गत रस्ते सुधारित करण्यात आले.
7) महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून Maha dbt योजने अंतर्गत असणाऱ्या अनेक शेती उपयोगी अवजारे देण्यात आली. ( Babasaheb Ambedkar National Excellent Sarpanch Award to Sulabha Bhote Sarpanch of Parandavadi Maval )
8) गावातील घनकचरा जमा करणेसाठी नवीन ट्रॅक्टर खरेदी केले आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सिमेंटमध्ये कंपाऊंड उभारले.
9) शुद्ध पाणी व्यवस्थापनसाठी गावामध्ये वॉटर फिल्टर प्लान्ट बसवला.
10) गावामध्ये बंदिस्त गटार लाईन करण्यात आली.
11) ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन बांधकाम करण्यात आले.
12) बौद्ध समाज मंदिराचे डागडूजीचे व सुशोभिकरणाचे काम करण्यात आले.
13) जेष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणीसाठी शिबीर राबवले.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात युवक राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर; 102 बाटल्या रक्त संकलित
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ पुन्हा ब्लॉक; ‘या’ काळात मुंबई लेन राहणार बंद, पाहा वाहतुकीचे नियोजन
– ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग टीमचे साहसी रेस्क्यू ऑपरेशन