व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अभिमानास्पद! परंदवडीच्या मा. सरपंच सुलभा भोते यांना ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच’ पुरस्कार

2022 साली सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर सुलभा भोते यांनी अनेक विधायक कार्ये गावात केली होती. गावाचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 14, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Parandavadi-Sarpanch-Sulabha-Bhote-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


परंदवडी (ता. मावळ) गावच्या माजी आदर्श सरपंच सुलभा कुंदन भोते यांना त्यांच्या वैशिष्ट्येपुर्ण कामगिरीसाठी 2023 सालचा ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच’ पुरस्कार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नवी दिल्ली इथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. 2022 साली सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर सुलभा भोते यांनी अनेक विधायक कार्ये गावात केली होती. गावाचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी केलेल्या पायाभूत कामांच्या जोरावर त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा हा सन्मान असल्याचे सुलभा भोते यांनी दैनिक मावळसोबत बोलताना सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सुलभा भोते यांचा अल्पपरिचय –
संपूर्ण नाव – सौ. सुलभा कुंदन भोते
माजी सरपंच ग्रामपंचायत परंदवडी (ता. मावळ, जि. पुणे.)
2022 साली सरपंच पदी निवड झाल्यानंतर कार्यकाळात गावात अनेक पायाभूत सुविधांची कामे सुरू केली. त्यात,
1) जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेच्या कामांना गती दिली.
2) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गावातील गरजू लोकांना घरकुल उपलब्ध करून दिले.
3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी ISO करण्यात योगदान.
4) इंदिरा कॉलेजच्या CSR फंडामार्फत अंगणवाडीचे वॉल कंपाऊंड करण्यात पुढाकार.
5) परंदवडी स्मशानभूमीच्या परिसरात झाडे व लोखंडी कंपाऊंड केली.
6) परंदवडी गावात अंतर्गत रस्ते सुधारित करण्यात आले.
7) महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून Maha dbt योजने अंतर्गत असणाऱ्या अनेक शेती उपयोगी अवजारे देण्यात आली. ( Babasaheb Ambedkar National Excellent Sarpanch Award to Sulabha Bhote Sarpanch of Parandavadi Maval )

8) गावातील घनकचरा जमा करणेसाठी नवीन ट्रॅक्टर खरेदी केले आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सिमेंटमध्ये कंपाऊंड उभारले.
9) शुद्ध पाणी व्यवस्थापनसाठी गावामध्ये वॉटर फिल्टर प्लान्ट बसवला.
10) गावामध्ये बंदिस्त गटार लाईन करण्यात आली.
11) ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन बांधकाम करण्यात आले.
12) बौद्ध समाज मंदिराचे डागडूजीचे व सुशोभिकरणाचे काम करण्यात आले.
13) जेष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणीसाठी शिबीर राबवले.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात युवक राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर; 102 बाटल्या रक्त संकलित
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ पुन्हा ब्लॉक; ‘या’ काळात मुंबई लेन राहणार बंद, पाहा वाहतुकीचे नियोजन
– ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग टीमचे साहसी रेस्क्यू ऑपरेशन


Previous Post

‘रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा द्या’ – खासदार श्रीरंग बारणे

Next Post

मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानुसार खंडाळा इथे मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण; महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maratha-community-strike-khandala

मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानुसार खंडाळा इथे मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण; महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.