रविवारी (25 सप्टेंबर) भाद्रपद पोळा म्हणजेच बैल पोळा ( Bail Pola 2022 ) होता. बैल पोळा हा बळीराजासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. आपल्या लाडक्या मित्राचा सण, म्हणजेच ज्याच्यासोबत वर्षभर शेतात शेतकरी राबतो त्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा.
मावळ तालुका ( Maval Taluka ) हा कृषी तालुका म्हणून सर्वत्र परिचित आहे. त्यामुळे तालुक्यात गावोगावी बैल पोळ्याचा उत्साह यंदाही दिसून आला. मात्र, या सर्वात तालुक्यातील एका शेतकऱ्याने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची फक्त तालुक्यातच नव्हे तर राज्यात चर्चा होत आहे.
हेही वाचा – लम्फी आजाराचा प्रादुर्भाव : कार्ला येथे 130 पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण
महाराष्ट्रावर सध्या लम्फी स्कीन ( Lumpy Skin Disease ) या चर्मरोगाचे सावट आहे. मावळ तालुक्यातही लम्फीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात पशूवैद्यकीय विभागाकडून गावोगावी लसीकरण सुरु आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लम्फी प्रतिबंधात्मक लसीकरणात ( Lymphatic Vaccination ) म्हणजेच समाजपयोगी अभियानात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने मावळ तालुक्यातील प्रगतशील शेतकरी बाबुराव वायकर ( Baburao Vaikar ) यांनी बैलांच्या मिरवणुकीचा खर्च टाळत लम्फी लसीकरणासाठी 3 हजार सिरींज ( lumpy Vaccine Syringe ) तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन दिल्या. ( Bail Pola 2022 lumpy Vaccine Syringes Gifted Avoiding Cost Of Bull Procession )
अधिक वाचा –
लम्फी स्कीन : वेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून पशूधनाचे मोफत लसीकरण
लम्फीचा प्रादुर्भाव; आमदार सुनिल शेळकेंचे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन