प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (दि. 21 फेब्रुवारी) रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती साठी प्रसिद्ध होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नाव घेतले तरीही अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( Bailgada Sharyat Fame Pandhari Shet Phadke Passes Away )
1669 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. पंढरी फडके हे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे.
अधिक वाचा –
– मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : अर्ज माघार घेण्यास उशीर झालेले उमेदवार मारूती असवले यांचा महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठींबा
– शिवजयंती निमित्त कार्ला येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव । Shiv Jayanti 2024
– मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घेतलाय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Maratha Reservation Bill