पवन मावळ : मावळ परिसरातील गावांमध्ये शनिवार (दिनांक 14) रोजी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरीराजा सोबत वारा, पाणी, पाऊस सर्व गोष्टी विसरून शेतीच्या कामामध्ये जास्तीत जास्त कष्ट करणाऱ्या सर्जाराजाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. सकाळी बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दुपारी तीनच्या सुमारास स्पर्धेचे आयोजन करून अनोखी बैलाची सुंदर अशी सजावट करण्यात आली. ( Bailpola Festival Celebrated With Enthusiasm In Pavan Maval Area Of Maval Taluka )
तर, विविध गावांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात बैलजोडीची मिरवणुक काढण्यात आली. तसेच शिवली गावात बैल पकडण्याची स्पर्धा आयोजित केली जाते.तर शिवली गावात पै.अशोक आडकर / पै.नवनाथ आडकर यांचा बिल्ला या बैलावर 67 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. जो हा मात्र बैल पकडेल त्याला ते बक्षीस देण्यात येते. पवनमावळ परिसरामध्ये येळसे, शिवली, पुसाने, धनगव्हाण, काले, कडधे, सावंतवाडी, तुंग, चावसर, अजिवली आदी गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बैलपोळा सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह –
मावळ तालुक्यात गावांमध्ये विविध पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो. विशेषत: ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतू या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. बैलपोळा सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार बळीराजा करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कशी केली जाते बैलजोडीची पूजा –
पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावुन त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल अथवा गुलालाच्या साह्याने किंवा रंगाने सुंदर नक्षीकाम केले जाते (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, शिंगाना गोंडे, गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, चवाराचा गोंडा (एक विशिष्ट झाडांच्या मुळ्या) नवी बेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, माथ्यावर नारळ, काकडी बांधली जाते. खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य असतो.
अधिक वाचा –
– ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची । अभिवादन नवदुर्गांना
– शेतकऱ्याचा खरा मैतर आणि जिवीचा जिवलग! मावळ तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा
– सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी भरत गोविंद ठाकर यांची बिनविरोध निवड