मावळ तालुक्यातील ताजे येथे लहान मुलांमध्ये भजनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना भजन, वादन सुरामध्ये करता यावे, या उद्देशाने बाल वारकरी शिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. पंडित किरण परळीकर यांच्या मार्गदर्शाखाली तसेच ह.भ.प. किसन केदारी आणि ह.भ.प.सुरेश केदारी यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार (दिनांक 27 ऑक्टोबर) रोजी ताजे येथील ताजुबाई मंदिर येथे हे शिबीर घेण्यात आले. ( Bal Warkari Education Camp Video Taje Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिबिरामध्ये मावळ तालुक्यातील तब्बल 100 बाल वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात स्तोत्रपठण, स्वरांचा रियाज कसा करावा, तसेच ‘सा व आकार’ यांचा रियाज मुलांकडून करून घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र केदारी, गोविंद कदम सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन दत्ता केदारी यांनी केले. यावेळी उपसरपंच सचिन केदारी, लक्ष्मण बालगुडे, अभिमन्यू शिंदे, नवनाथ थोरवे, गोरख केदारी, जयवंता केदारी, राजू पिंगळे, संतोष केदारी, हिरामण केदारी, खंडू केदारी, बाळू सुतार, मनोहर केदारी, बंडू केदारी, खंडू मा केदारी आदीजण तसेच गावातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या.
अधिक वाचा –
– मावळातील निगडे गावातील पाणी प्रश्न सुटला, घरोघरी येणार जलगंगा
– पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला आग, पाहा थरारक व्हिडिओ