शिक्रापूर बाजूकडून चाकण मार्गे तळेगाव बाजूकडे जाण्यास व तळेगाव बाजूकडून चाकण मार्गे शिक्रापुरकडे येण्यास हलकी / लहान (LMV) वाहने वगळून सर्व जड / मध्यम वाहनांचे वाहतुकीस सकाळी 8 ते 11 वाजेच्या दरम्यान आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेदरम्यान प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक शाखेकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. उद्या, रविवार सकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहे निर्बंध, वाचा –
चाकण तळेगाव चौकातून तळेगाव-चाकण आणि चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी, मुंबई त्याचप्रमाणे रांजणगाव औद्योगिक क्षेत्रास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग असून तो चाकण तळेगाव चौकातून जातो. तसेच पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र ६० हा देखील सदर चौकातून जातो. तसेच सदर चौकात हलकी जड अवजड वाहनांची तसेच पादचाऱ्यांची देखील मोठी वर्दळ असल्याने सदर चौकात तसेच मार्गावर वारंवार वाहतुक कोंडी होत असून किरकोळ तसेच प्राणांतिक अपघात होवून जिवीतहानी होत असते.
सदर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्याकरीता तसेच होणारे किरकोळ व गंभीर अपघातांना प्रतिबंधित करणेकरीता तसेच सदर चौकातील वाहतुक ही सुरक्षित व सुरळीत होवून गतिमान होणेकरीता आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. त्या करिता, शिक्रापूर बाजूकडून चाकण मार्गे तळेगाव बाजूकडे जाण्यास व तळेगाव बाजूकडून चाकण मार्गे शिक्रापुरकडे येण्यास हलकी / लहान (LMV) वाहने वगळून सर्व जड / मध्यम वाहनांचे वाहतुकीस सकाळी 8 ते 11 वाजेच्या दरम्यान आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेदरम्यान प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
तरी सदर मार्गावरून जाणाऱ्या जड / मध्यम वाहनांचे वाहनचालकांनी सकाळी 8 ते 11 वाजे दरम्यान आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेदरम्यान नमुद मार्गावर आपली वाहने घेऊन येवू नये असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेमार्फत करण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड यांच्या सहीचे असे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ( Ban on heavy vehicles on Talegaon Chakan route between 8 am to 11 am and 5 pm to 8 pm )
अधिक वाचा –
– स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ; विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप । Maval News
– देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! मावळात दोन ठिकाणी अंमली पदार्थांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त