Dainik Maval News : देहूरोडमध्ये सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार पदयात्रेला देहूरोड आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डमधील वार्ड क्र. १ ते ७ मध्ये सर्वधर्मीय तरुणाई, महिलांनी जंगी स्वागत करीत बापूसाहेब भेगडेच ‘फिक्स’ आमदार असल्याचा एल्गार केला.
फुलांच्या पाकळ्यांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि ‘बापूसाहेब भेगडे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ची घोषणाबाजी करीत बापूसाहेब भेगडेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा विश्वास दिला.
बापूसाहेब भेगडे यांची ही प्रचार पदयात्रातळेगाव स्टेशन परिसरातील सोसायट्या, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डमधील वार्ड क्र. १ ते ७ मध्ये काढण्यात आली. यामध्ये झेंडे मळा ते हगवणे मळा, काळोखे मळा, किन्हई, चिंचोली, निगडी सिद्धिविनायक ते दत्तनगर, ऑर्डनन्स फॅक्टरी, सवाना चौक या भागाचा समावेश होता.
देहूरोडमध्ये बार्शी चाळ, मंडई, सुभाष चौक, सोनार आळी, गुरुद्वारा, बुद्ध विहार, बोराणा वकील, स्वामी विवेकानंद चौक, शिवाजीनगर, दत्त मंदिर, पाठीमागचा भाग, आंबेडकर नगर, गांधीनगर, कोहली गॅस, मेहता पार्क, शितळानगर नं. २, मामुर्डी गाव, बरलोटा नगर, शितळानगर नं.१, थॉमस कॉलनी या मार्गे प्रचार पदयात्रा काढण्यात आली.
जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतसा अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा वाढत चालला आहे. देहूरोड आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डमधील वार्ड क्र. १ ते ७ मधील नागरिकांनी बापूसाहेब भेगडे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.
देहूरोडमधील सर्व रस्ते व चौक नागरिकांच्या अलोट गर्दीने व फुलांच्या पाकळ्यांनी भरून गेले होते. यामध्ये सर्वधर्मीय लोकांनी बापूसाहेब भेगडे यांना आम्ही सोबत आहोत, हा विश्वास देत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पोलिसांचा आगळा वेगळा ‘मावळ पॅटर्न’ : भयमुक्त निवडणुकीसाठी तालुक्यातून 101 गुन्हेगार हद्दपार
– शांत – सुरक्षित आणि समृद्ध मावळसाठी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा ‘वचननामा’ प्रसिद्ध । Bapu Bhegade
– होम ग्राउंडवर सुनिल शेळके यांचे भव्यदिव्य स्वागत ! हजारोंच्या संख्येने तळेगावकर रस्त्यावर । MLA Sunil Shelke in Talegaon