व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात पैशाच्या वादातून मारहाण ; गोळीबारात एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू ; कामशेतजवळील मुंढावरे येथील घटना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 4, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : एका व्यावसायिकाच्या वाहन चालकास पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने कोयता, दांडक्याने मारहाण केली. यावेळी जीव वाचण्यासाठी संबंधित व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास कामशेत पोलीस ठाणे हद्दीतील मुंढावरे गावजवळील इंद्रायणी ढाब्याजवळ घडली.

याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून इतर पाच ते सहाजण फरार आहेत. रोहित मदन कुर्मा (25, रा. रामनगर, पिंपरी) असे गोळीबारात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी आरोपी अशोककुमार मुनेष्वर सिंग (60, रा. तापकीरमळ चौक, काळेवाडी, पिंपरी, मूळ रा. आजमगढ, उत्तर प्रदेश) व आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत (23, रा. रामनगर, देहूरोड) अशी आरोपींची नावे असून, इतर सहा ते सात जणांची ओळख पटली नाही.

कामशेत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरोपी अशोककुमार मुनेष्वर सिंग हा वाहनचालक असून, त्याचा मालक हरीश सिंग हा आहे. हरीश सिंग आणि आरोपी आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत यांच्यात व्यावसायातील पैशांवरून वाद होता. या वादातून आकाश राजपूत आणि त्याच्या आठ ते नऊ साथीदारांनी फिर्यादी अशोककुमार मुनेष्वर सिंग याला मुंढावरे गावच्या हद्दीतील इंद्रायणी ढाबा येथे गाठून शिवीगाळ केली; तसेच त्याला आणि त्याचा मालक हरीश सिंग याला जीवे मारण्याची धमकी दिली; तसेच तुम्ही आमच्या व्यवहाराचे पैसे दिले नाहीत, तुम्हाला संपवूनच टाकतो, असे म्हणत अशोककुमारच्या कारवर कोयते, दांडक्यांनी हल्ला करून नुकसान केले व गाडीतून खाली ओढून त्याच्यावर हत्यारांनी हल्ला केला.

यावेळी अशोककुमारने या हल्ल्यातून वाचण्यासाठी स्वसंरक्षणार्थ टोळक्याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात रोहित कुर्माच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, अशोककुमार मुनेष्वर सिंग आणि इतर दोघेजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, कामशेत पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी पोलिसांनी अशोककुमार मुनेश्वर सिंग याच्यासह इतरांना दोघांना ताब्यात घेतले. तसेच, या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेंकाविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. तसेच, या प्रकरणातील इतर फरारी आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

आरोपी आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत आणि रोहित मदन कुर्मा हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूतच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तर, मयत आरोपी रोहित कुर्मा याच्या विरोधात पिंपरी, निगडी व मंचर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शंकर पाटील हे करीत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात


Previous Post

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ

Next Post

विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Elections that started on issue of development ended on issue of money Rain of money in Maval

विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.