मावळ तालुक्यातील वारू गावच्या प्रसिद्ध गायिका, भागवताचार्य हभप भिमा ताई ज्ञानेश्वर लोंढे यांना शनिवारी (दिनांक 6 मे) संगीत विशारद पदवी प्रदान करण्यात आली
मावळ तालुका आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेली 40 वर्षांपासून भिमाताई लोंढे अव्याहतपणे भजन, कीर्तनाच्या माध्यमातून अविरतपणे सेवा करत आहेत. त्यामुळेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडून भिमाताई ज्ञानदेव लोंढे यांना शास्त्रीय संगीतातील ” संगीत विशारद ” पदवी प्रदान करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवार (दिनांक 6 मे, 2023) रोजी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने वाशी, मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांना संगीत विशारद पदवी प्रदान करण्यात आली.
भीमा ताई लोंढे या सध्या सांगवी (पुणे ) सुप्रसिद्ध गायक सुधाकर चव्हाण यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत आहेत. संगीत अलंकार पदवीचे शिक्षण सुरू आहे. ( Bhimatai Londhe from varu village of Maval taluka was awarded by Music Master degree )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, लगेच पाहा
– आमदारांचा मदतीचा हात अन् दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हसू; सुनिल शेळकेंकडून दिव्यांगांना घरपोच साहित्य