मावळ तालुक्यातील पिंपळखुटे येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ गुरुवार ( 7 ऑक्टोबर ) रोजी महिला-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ( Bhoomipujan ceremony of Pimpalkhute tap water supply )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्याचे ( Maval Taluka ) विद्यमान आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील अनेक गावात जल जीवन मिशनच्या ( Jaljeevan Mission ) माध्यमातून घरोघरी जलगंगा येत आहे. त्यापैकी एका योजनेचा भुमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. मावळमधील पिंपळखुटे गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. पिंपळखुटे नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन गुरुवारी संपन्न झाला.
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पिंपळखुटे योजनेसाठी सुमारे 1 कोटी ३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून गावासह वाडी-वस्तीवरील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहचणार आहे. या भूमिपूजन समारंभप्रसंगी पीडीसीसी बँकेच्या माजी अध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारीका शेळके, अल्पसंख्याक सेल अध्यक्षा शबनम खान तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. (Bhoomipujan ceremony of Pimpalkhute tap water supply scheme concluded with hands of women and sisters )
अधिक वाचा –
‘कुलदेवतेच्या साक्षीने सांगतो गहुंजेची पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून घेतली’ – आमदार सुनिल शेळके
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा, जाणून घ्या स्पर्धेबद्दल सर्वकाही I MLA Sunil Shelke Birthday