Dainik Maval News : मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार दिन ( दि. ६ ) करंजगाव ( नाणे मावळ ) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण, मानवता आणि सेवाभाव या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप व आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट वितरणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त मावळ तालुक्यातील करंजगाव येथील प्राथमिक शाळेतील २६ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले, तर १०० आदिवासी महिला व पुरुषांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचत समाजप्रबोधनाचे कार्य कसे केले, याची आठवण करून देत त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पसायदान संस्थेचे राजेश बद्रे, संजीव येलगे, वर्षा येलगे, रत्नाकर जाधव, अभा गुप्ता, सागर काकडे उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटील राजश्री तंबोरे, सरपंच उज्वला पोटफोडे, माजी सरपंच कौशल्या पवार, माजी सरपंच शरद सोरकाते, उपसरपंच नवनाथ ठाकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग गोडे, ग्रामसेवक चंद्रकांत मोरे, योगेश माझिरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश साबळे, संतोष पवार, अशोक गोडे, सुदाम कुडले, कांताराम दहातोंडे, रवींद्र पवार, सुरेश वाघमारे, काळूराम वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, साधू पोटफोडे, संदीप पोटफोडे, विजय खेंगले, सोमनाथ पोटफोडे, जयश्री कुडले, सविता मिसाळ, आरती साठे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेखा पोटफोडे, काजल साबळे, पुनम ठाकर, सुषमा शेलार, तुकाराम भालशिंगे, पुनम पोटफोडे, सतीश कांबळे, सुरेश उंडे उपस्थित होते.
मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष विशाल विकारी, उपाध्यक्ष भारत काळे, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे, ज्येष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, खजिनदार संकेत जगताप यांसह विशाल कुंभार, शिवानंद कांबळे, प्रफुल्ल ओव्हाळ, सागर शिंदे, प्रशांत पुराणिक, रेश्मा फडतरे, संजय हुळावळे यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पसायदान संस्थेचे संजीव येलगे यांनी सायकल चालविण्याचे आरोग्यविषयक फायदे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक भान आणि पत्रकारितेच्या मूल्यांचा संगम साधणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला. हा कार्यक्रम पसायदान संस्था व मावळ तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

