पुणे रेल्वे स्थानकाहून सुटणाऱ्या तब्बल 12 रेल्वे गाड्या रविवारी (दिनांक 20 ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असून चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामामुळे रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि लोणावळ्याहून पुण्याकडे येणाऱ्या अनेक लोकल रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ( Big news Many trains departing from Pune railway station will be closed on Sunday check schedule immediately )
पुणे विभागातील लोणावळा वर पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड – खडकी स्टेशन दरम्यान रविवारी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. आटोमेटिक सिग्नलिंगचे काम केले जाणार असल्याने मुंबईला जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या सोबतच लोकल सेवा देखील या दरम्यान, बंद ठेवण्यात येणार आहे.
खालील लोकल रद्द;
पुणे-तळेगाव : सकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी
पुणे-तळेगाव : सकाळी 8 वाजून 53 मिनिटांनी
पुणे-लोणावळा : सकाळी 6 वाजून 30 मिनिटांची, सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी, सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी, दुपारी 3 वाजता, दुपारी 4 वाजून 25 मिनिटांनी
शिवाजीनगर-तळेगाव : दुपारी 3 वाजून 47 मिनिटे, सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटे.
शिवाजीनगर-लोणावळा : सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी.
लोणावळा-शिवाजीनगर : सकाळी 6 वाजून 30 मिनिटे, सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी, दुपारी 3 वाजून 30 मिनिटे.
तळेगावहून सुटणारी – सकाळी 7 वाजून 48 मिनिटे, सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी, दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी,
लोणावळाहून सुटणारी – सकाळी 7 वाजून 25 मिनिटे, सकाळी 8 वाजून 20 मिनिटे, दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी
या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ( Big news Many trains departing from Pune railway station will be closed on Sunday check schedule immediately )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पाटण गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; 160 महिलांची कार्यशाळेला उपस्थिती
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक संपन्न, आयुक्त सौरभ राव यांनी दिले महत्वाचे निर्देश
– …अन् दारुंब्रे शाळेच्या भिंती लागल्या बोलू, आमदार सुनिल शेळकेंकडून तोंडभरुन कौतूक