शनिवार, रविवार आणि सोमवारी 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन यामुळे सलग तीन सुट्ट्या जोडून आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले आहेत. यामुळेच मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (दि. 29 एप्रिल) देखील महामार्गावर मोठ्या प्रमामावर वाहतूक कोंडी झाली होती, त्यानंतर आज रविवारी देखील बोरघाट, सायमाळ भाग आणि अंडा पॉइंट इथे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आधीच उकाडा आणि त्यात वाहतूक कोंडी त्यामुळे अनेक वाहने घाटात अडकून पडत असून यामुळे ट्राफिकच्या समस्येत आणखीम भर पडत असल्याचे दिसत आहे. सकाळपासून खोपोली पोलिस, आयआरबी, वाहतूक पोलिस आणि अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक आदी सर्वजण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतू मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने घाटात आणि महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. ( Big traffic jam on Mumbai Pune Expressway video )
अधिक वाचा –
– वेहेरगाव इथे गावठी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा, 1600 लीटर दारू जप्त
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली