मराठा आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मोठा लढा उभारला होता. त्या लढ्याचे यश म्हणजे मराठ्यांचा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला असता वाशी येथेच राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याचे निर्णय घेत अध्यादेश काढला. त्यानंतर आता प्रत्यक्षात हा अद्यादेश अधिवेशनात मंजूर करून घेत, या निर्णयाची अंमलबजावणी लवकर सुरु करावी यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सरकारने राज्य विधिमंडळाचे ह्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे आणि मागण्यांची पूर्तता लगेच करावी, यासाठी मनोज जरांगे पाटील मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड विभाग आणि मावळ विभाग मिळून ही रॅली होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर ते मावळ तालुका अशी भव्य दुचाकी, चार चाकी रॅली होणार आहे. (Bike and car rally in Pimpri Chinchwad and Maval taluka on Wednesday in support of Manoj Jarange Patil)
पिंपरी-चिंचवड विभाग फेरी मार्ग :
डांगे चौक-काळेवाडी फाटा-जगताप डेअरी चौक-रहाटणी चौक-पिंपळे सौदागर-पिंपरी गाव-बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी, चिंचवड स्टेशन- खंडोबा माळ आकुर्डी भक्ती शक्ती चौक निगडी-देहूरोड-सोमाटणे-तळेगाव-छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव फाटा येथे समारोप होईल.
मावळ विभाग फेरी मार्ग :
खंडाळा-लोणावळा-वाकसई कार्ला-शिलाटणे-कामशेत (पवन मावळ -नाणे मावळ)- कान्हे फाटा (आंदर मावळ)-वडगाव मावळ- छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव फाटा येथे समारोप होईल.
अधिक वाचा –
– Breaking! पुन्हा ब्लॉक..! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा । Block On Mumbai Pune Expressway
– शिवस्मारकाची उभारणी ते सार्वजनिक सभागृह, जीम-योगा सेंटर; कान्हे ग्रामपंचायतमधील विविध कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून नवीन महानगरपालिका बनणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा