अग्रवाल विद्या प्रसारक मंडळ संचलित गीता विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सोमाटणे फाटा (ता. मावळ, जि. पुणे) येथील ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असलेला विद्यार्थी आरव राजेश शेट्टी याने जेईई मेन 2023 ( JEE Main 2023 ) परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले. आरवने जेईई मेन परीक्षेच एनटीए गुण 98.44 ( NTA Score ) असे यश मिळवले. त्यानिमित्त शाळेकडून आरव राजेश शेट्टी याला एक्टिव्हा दुचाकी भेट देऊन त्याचा गौरव सत्कार करण्यात आला.
मॅथेमॅटिकस प्रा. जे. टी. अग्रवाल, फिजिक्स प्रा. गीता अग्रवाल, केमिस्ट्री प्रा. उदगिरे सर आदींनी अतिशय तळमळीने मला शिकवले. शिक्षकांनी दिलेले ट्रिक्स आणि टेक्निकचा भरपूर उपयोग झाला. ह्या यशात शिक्षकांचा वाटा बहुमूल्य असून आणि गीता विद्यानिकेतनमधील कॉलेजच्या शिक्षकांसारखे शिकवणारे शिक्षक असतील तर यश नक्कीच मिळते, असे मनोगत आरव राजेश शेट्टीने ह्याप्रसंगी व्यक्त केले. ( Bike Gift To Student Of Geeta Vidyaniketan Junior College Who Achieved Great Success In JEE Main 2023 Main Exam Somatne Phata Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी, जेईई एडव्हान्स क्रॅक करून आयआयटी मधून कॉम्प्युटर इंजिनीरिंग करणार असल्याचे आरव राजेश शेट्टीने सांगितले. तसेच डॉ. ह्रिषीकेश शिंदे MBBS, डॉ. श्वेता मित्तल BDS, डॉ अमिषा अग्रवाल BDS, डॉ. रितिक राठोड MBBS, कुशल अग्रवाल JEE 2022 टॉपर NTA Score 96, कुन्जल अग्रवाल JEE 2020 टॉपर NTA Score 91, कशिश गोयल या काही माजी विद्यार्थ्यांचा चांदीचे नाणे आणि श्रीफळ देऊन त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक आणि संचालक प्रा. जे. टी. अग्रवाल यांनी सांगितले की गीता विद्यानिकेतन जुनिअर कॉलेजची 12वी सायन्सची 5वी बॅच परीक्षेला जाणार आहे. यापूर्वीच्या 4 बॅचेसचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय हुशार असतात पण योग्य मार्गदर्शनाअभावी स्पर्धात्मक परीक्षेत मागे पडतात, अशी खंत सुद्धा प्रा. जे. टी. अग्रवाल यांनी व्यक्त केली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून, परीक्षेसाठी 7000 हून अधिक केंद्र
– छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखडा मंजूर ते राज्यात पीएम श्री योजना राबवणार, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे सर्व निर्णय