Dainik Maval News : भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना २६ मार्च रोजी काळोखे चौक, देहूगाव बायपास रोड, येथे घडली. प्रदीप अंबादास चौधरी (वय ४७, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एमएच १४ डीएम ४५८७ या टेम्पो वरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी हे दुचाकीवरून घरी चालले होते.
ते काळोखे चौक, देहूगाव बायपास रोड येथे आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी प्रदीप चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News