Dainik Maval News : भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस गुरुवारी (दि. 10 एप्रिल) रोजी वडगाव मावळ येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सकाळी प्रभातफेरी त्यानंतर श्री महावीर आनंद भवन येथे धार्मिक कार्यक्रम, लहान मुलांचे विविध गुणदर्शन, मंगलपाठ आणि प्रभावना वाटप असे विविध कार्यक्रम यानिमित्त संपन्न झाले.
यावेळी उपस्थित असलेल्या कर्नाटक केसरी प.पू.गणेशलालजी म. सा. आणि पंडितरत्न हीराकुंवरजी म. सा. यांच्या सुशिष्या जिनशासन चंद्रिका प.पू. उज्ज्वलाकुंवरजी म.सा, स्पष्ट वक्ता प.पू. कीर्तीसुधाजी म.सा. आणि प.पू.उन्नतीश्रीजी महासतीजी यांचे भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संपन्न झाले.
- श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून नियुक्त झालेले अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, सचिव डॉ.सुनील बाफना, खजिनदार सनी सुराणा यांचा श्री संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. वा
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ. सुनील बाफना, प्रीतम बाफना, आशिष बाफना यांनी केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा यांनी केले. श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ, युथ ग्रुप, महिला मंडळ, पाठशाळा मंडळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ज्येष्ठ मार्गदर्शक, युवक, महिला आणि लहान मुले याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates