मावळ तालुक्यातील सहाय्यक निबंधकांचे निलंबन व्हावे आणि त्यांच्या बेकायदेशीर निर्णयाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी मावळ भाजपा च्या ( BJP ) वतीने रविवार (दिनांक 11 सप्टेंबर) रोजी पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. बुधवार (दिनांक 14) रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत विठ्ठल सूर्यवंशी ( Vitthal Suryavanshi ) सहाय्यक निबंधक ( Assistant Registrar ) वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) यांच्यावर कारवाई न झाल्यास गुरुवारी आंदोलन करण्याचा इशाराही याच पत्रकार परिषदेत दिला होता. ( BJP Calls For Talathok Protest )
त्यानुसार विठ्ठल सुर्यवंशी यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे वडगाव मावळ येथील कार्यालयावर भाजपाकडून गुरुवारी मोर्चा काढून टाळाठोक आंदोलन ( Talathok Protes ) करण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
टाळाठोक आंदोलन शेतकरी बांधवांनो हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा..!
गुरुवारी करण्यात येणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी.आय. (A) महायुतीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी गुरुवारी दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता सहाय्यक निबंधक वडगाव मावळ विठ्ठल सुर्यवंशी यांच्या अनागोंदी कारभार विरोधात टाळाठोक आंदोलन करण्यात येणार आहे. तरी महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी व्हावे..!’ असे आवाहन करण्यात आले आहे. ( BJP Calls For Talathok Protest On Thursday 15th September In Vadgaon Maval City Against Assistant Registrar Vitthal Suryavanshi )
अधिक वाचा –
एकविरा देवस्थानच्या ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्याची मागणी
रविंद्र भेगडेंनी घेतले लोणावळ्यातील मावळचा राजा गणेशाचे दर्शन
एकविरा देवस्थानच्या ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्याची मागणी