महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या लांबलेल्या निवडणूकांमुळे राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकांमधून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकांत नेत्यांनी जातीने लक्ष घातलेले दिसत आहे. अशावेळी राज्यात जिथे काँग्रेस आणि भाजपा एक एकमेकांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाही, तिथे मावळ तालुक्यात मात्र वेगळाच राजकीय प्रयोग होताना दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ (तळेगाव दाभाडे) निवडणूकीत चक्क भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील एक गट यांची युती झाल्याने या युतीची राज्यात मोठी चर्चा होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे शिवसेना, स्वाभिमानी रिपल्बिकन पक्ष यांचा मिळून महाविकास आघाडी सहकार पॅनल बनला आहे, या पॅनलचे एकूण 18 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप, शिवसेना, रिपांई व काँग्रेस (गट) मिळून श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकार परिवर्तन पॅनल बनला आहे, ज्यांचे एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत. तर 4 अपक्ष उमेदवार या निवडणूकीत आपले नशीब आजमावणार आहेत. ( BJP Congress Alliance In Maval Agricultural Produce Market Committee Elections Sunil Shelke Bala Bhegde Face Off 40 Candidates Are In Fray )
महाविकास आघाडीकडून आमदार सुनिल शेळके, बापू भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बाबुराव वायकर, विठ्ठल शिंदे, दिपक हुलावळे, नामदेवराव दाभाडे या नेत्यांनी पॅनलचे उमेदवार जाहीर केलेत. तर, सर्व पक्षीय पॅनलकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, सूर्यकांत वाघमारे, राजाराम शिंदे यांनी उमेदवार जाहीर केले.
महाविकास आघाडी सहकार पॅनल
सर्वसाधारण कृषी पतसंस्था : संभाजी आनंदराव शिंदे, दिलीप नामदेव ढोरे, सुभाष रघुनाथ जाधव, विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोजगे, मारुती नाथा वाळुंज, साईनाथ दत्तात्रय मांडेकर
कृषी पतसंस्था महिला : सुप्रिया अनिल मालपोटे, अंजली गोरख जांभूळकर
कृषी पतसंस्था ओबीसी : शिवाजी चिंधू असवले
कृषी पतसंस्था भटक्या विमुक्त जमाती : विलास बबन मानकर
ग्रामपंचायत सर्वसाधारण : विक्रम प्रकाश कलवडे, नामदेव नानाभाऊ शेलार
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल : अमोल अरुण मोकाशी
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती : नथु शंकर वाघमारे
व्यापारी सर्वसाधारण : भरत दशरथ टकले, महेंद्र छगनलाल ओसवाल
हमाल तोलारी सर्वसाधारण : शंकर अंतू वाजे
छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनल
सर्वसाधारण कृषी पंतसंस्था : शत्रुघ्न रामभाऊ धनवे, निलेश विष्णू मराठे, बंडू तुकाराम कदम, सुभाष रामभाऊ देशमुख, विशाल बबनराव भांगरे, प्रसाद प्रकाश हुलावळे, खंडू बाळाजी तिकोने
कृषी पतसंस्था महिला : नंदा देवराम सातकर, कांचन सुभाष धामणकर
कृषी पतसंस्था ओबीसी : एकनाथ नामदेव पोटफोडे
कृषी पतसंस्था भटक्या विमुक्त जमाती : शरद परशुराम साळुंखे
ग्रामपंचायत सर्वसाधारण : योगेश गजानन राक्षे, शिवराम मारुती शिंदे
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल : अस्लम जमिल शेख
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती : अंकुश ज्ञानदेव सोनवणे
व्यापारी सर्वसाधारण : प्रकाश रामचंद्र देशमुख, नामदेव ज्ञानेश्वर कोंडे
हमाल तोलारी सर्वसाधारण : हनुमंत ईश्वर मराठे
अपक्ष उमेदवार : सुनील दाभाडे, जितेंद्र परदेशी, नवनाथ हरपुडे, परशुराम मालपोटे
काँग्रेसचा एक गट भाजपासोबत : मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत तालुक्यातील काँग्रेसचा एक गट सर्वपक्षीय पॅनलमध्ये गेला आहे, तर एक गट महाविकास आघाडी सोबत राहिला आहे. तसेच, राष्ट्रवादीचा एक इच्छुक उमेदवारही उमेदवारी न मिळाल्याने सर्वपक्षीय पॅनलमध्ये गेला आहे.
सहायक निबंधक शिवाजी घुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्रकुमार नेहुल, जितेंद्र विटकर, गंगाधर कोतावार, राकेश निखारे आदीजण हे या निवडणूकीचे कामकाज पाहत आहेत.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– सोहळा कृतज्ञतेचा! बोरघाट बस अपघातात देवदूत बनून धावलेल्या विविध रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांचा खास सन्मान
– देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन