व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, February 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरासाठी स्वतंत्र फिडरमधून वीजपुरवठा करण्याची मागणी ; तालुक्याच्या राजधानीतील विजेचा लपंडाव थांबवावा

वडगाव शहराला 24 तास वीज पुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र फिडरवरून वीजपुरवठा करावा, अशी मागणी वडगाव शहर भाजपाने केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 10, 2024
in लोकल, शहर
Vadgaon Maval city

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ शहरामध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे, हा लपंडाव थांबवावा. वडगाव शहराला 24 तास वीज पुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र फिडरवरून वीजपुरवठा करावा, अशी मागणी वडगाव शहर भाजपाच्या वतीने वीज वितरण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर, अतिश ढोरे, महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत सचिव अरुण वाघमारे, रविद्र म्हाळसकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र वेडे यांना निवेदन दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळ हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, बँका व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या ठिकाणी तालुक्यातील नागरिक सर्व शासकीय कार्यालये, तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय येथे येत असतात. ग्रामीण भागातून, दर्‍या खोऱ्यातून येणारे सर्वसामान्य जनता लाईट नसल्यामुळे निराश होऊन कामे न झाल्याने माघारी परत जातात. ( BJP demand for supply of electricity from separate feeder for Vadgaon Maval city )

नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन वडगाव शहराला स्वतंत्र फिडर उर्से सब स्टेशनवरुन घेतल्यास अखंडित वीजपुरवठा चालु राहील. प्रशासनातील लोकांची कामे होतील व ग्राहकांची कामे होतील, तसेच शासनाला नियमित महसूल मिळेल. तसेच या अंतर्गत असणारे छोटे छोटे व्यवसाय दुकानदार यांना देखील यामधून योग्य वीज मिळेल.

प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून त्याचे अंदाजपत्रक तयार करून स्वतंत्र ‘फिडर योजना त्वरित करावी, भविष्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास काही अनर्थ घडल्यास सर्वस्व जबाबदार वीज वितरण कंपनी राहील. तसेच या प्रक्रियेला लवकरात लवकर कामात सुरवात न झाल्यास भाजपाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा –
– निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान ठाकर बिनविरोध । Gram Panchayat Election
– लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police
– चिंचवड शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास प्रारंभ ; खासदार श्रीरंग बारणेंचे महिलांना आवाहन…


Previous Post

भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी, आमदार सुनिल शेळके यांची विधानसभेत मागणी, वाचा काय म्हणालेत आमदार…

Next Post

उंदीर पकडायच्या जाळीत अडकले नागोबा, सर्पमित्रांंकडून जीवदान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
snake caught in rat trap

उंदीर पकडायच्या जाळीत अडकले नागोबा, सर्पमित्रांंकडून जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

February 12, 2026
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of Guardian Minister Sunetra Pawar

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

February 12, 2026
From Congress dominance to BJP Supda Saaf complete history of Maval Panchayat Samiti Pune Zilla Parishad

६३ वर्षांचा राजकीय पट : काँग्रेसच्या वर्चस्वापासून भाजपाचा ‘सुपडा साफ’पर्यंत.. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा संपूर्ण इतिहास

February 12, 2026
Ramdas Shete elected unopposed as president of Amble Cooperative Society felicitated by village deity

आंबळे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास शेटे बिनविरोध ; ग्रामदैवताच्या साक्षीने सत्कार, मान्यवरांकडून शुभेच्छा

February 12, 2026
land lands image

शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा

February 12, 2026
Accident

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक ; सोमाटणे फाटा येथील भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू

February 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.