व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात व्यापाऱ्यांवर झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

लोणावळ्यात व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 26, 2023
in लोकल, शहर
lonavala-bjp-police

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळ्यात व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोणावळ्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, गुन्हेगारीला आळा घालावा व हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, यासाठी भाजपच्या व्यापारी आघाडीच्या वतीने सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची भेट घेत कारवाईची मागणी करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय पारख, प्रदेश सदस्य आशिष बुटाला, प्रकाशराज चौहाण, कांतिलाल भंडारी, बाळासाहेब जाधव, प्रथमेश पाळेकर, ललित ओसवाल, हिरल जैन, श्रावण चिकणे आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. ( BJP demands from lonavala police to take strict action against culprits in case of beating up traders )

लोणावळ्यात गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिलेले नाही, शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. शहरात कायदा व सुव्यवस्था राखत गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. सततच्या हल्ल्यांमुळे व्यापारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिक देखील सुरक्षित राहिलेले नाही. कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे व वारंवार गुन्ह्यांच्या घटना घडत आहे. याकरिता पोलिस यंत्रणेने याची दखल घेत हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अन्यथा लोणावळा बंद करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.

अधिक वाचा –
– अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली आमदार शेळकेंची भेट; आमदारांनी दिला मोलाचा सल्ला!
– शेतात जाणारा रस्ता अडवलाय? थेट तहसीलदारांकडे करा तक्रार; प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावा असा ‘मामलेदार कोर्ट कायदा’


Previous Post

मोठी बातमी! पवनानगर भागातील जुगार अड्ड्यांवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Next Post

‘मावळ लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार’, सचिन अहिर यांनी ठणकावून सांगितले, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Lok-Sabha-shhivsena

'मावळ लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार', सचिन अहिर यांनी ठणकावून सांगितले, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.