Dainik Maval News : मध्य रेल्वेच्या लोणावळा- मळवली विभागात उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी तीन दिवसीय ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक 6 ते 8 एप्रिल दरम्यान असेल. या कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ( mega block on central railway at lonavala )
- मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा – मळवली विभागात प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 4 स्टील्स उभारणीसाठी, समांतर रेल्वे फाटकाच्या (लेव्हल क्राॅसिंग गेट) जागी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मळवली – लोणावळा दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावरील हा ब्लॉक 6 ते 8 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. ब्लाॅक काळात रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ब्लॉक क्रमांक 1 (रविवार, 6 एप्रिल रोजी दुपारी 2.05 ते दुपारी 4.05 पर्यंत)
1. लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
गाडी क्रमांक 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे दुपारी 4.05 वाजेपर्यंत थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्स्प्रेस कर्जत येथे दुपारी 3020 वाजेपर्यंत थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक 22194 ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस चौक येथे 10 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.
2. लोकलच्या वेळापत्रकात बदल
गाडी क्रमांक 99814 पुणे – लोणावळा लोकल आणि गाडी क्रमांक 9816 शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
गाडी क्रमांक 99816 लोणावळा – पुणे लोकल आणि गाडी क्रमांक 99815 लोणावळा – शिवाजी नगर लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.
ब्लॉक क्रमांक 2 (सोमवार, 7 एप्रिल रोजी दुपारी 1.05 ते दुपारी 2.35 पर्यंत)
लोकलच्या वेळापत्रकात बदल
गाडी क्रमांक 99816 शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
गाडी क्रमांक 99816 लोणावळा – पुणे लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.
ब्लॉक क्रमांक 3 (मंगळवार, 8 एप्रिल रोजी दुपारी 1.05 ते दुपारी 3.05 पर्यंत)
लोकलच्या वेळापत्रकात बदल
गाडी क्रमांक 99816 शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
गाडी क्रमांक 99813 लोणावळा – पुणे लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News