Dainik Maval News : सांगवी (पिंपरी-चिंचवड) येथील मानसी प्रशांत गोविंदपुरकर ही एकवीस वर्षीय तरूणी मंगळवार, दि. १८ मार्च पासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह गुरुवारी (दि.२० मार्च) किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला आहे. गुरुवारी शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सदस्यांनी बेपत्ता मानसीचा शोध घेतला असता गडपायथ्याशी असलेल्या नवग्रह मंदिराजवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आला.
मानसी गोविंदपुरकर ही तरूणी मंगळवारी घरातून कॉलेजला जात असल्याचे सांगून किल्ले लोहगड परिसरात आली होती. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास एका टॅक्सीतून ती एकटीच गडावर आल्याचे व गडावर जाताना तिकीट काऊंटर वरील सीटीटीव्हीत दिसल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर तरूणीचे नातेवाईक, पोलीस व शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सदस्यांनी गडावर, पाण्याचे टाके, तलाव व गड पायथ्याशी तिचा शोध घेतला.
- शोध मोहीम सुरू असताना गड पायथ्याशी असलेल्या घेरेवाडीकडील बाजूस असणाऱ्या नवग्रह मंदिराच्या जवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आला. शिवदुर्गच्या सदस्यांनी अथक प्रयत्नातून तरूणीचा मृतदेह बाहेर काढला व पोलिसांच्या स्वाधीन केला. गडावरून पडून तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, परंतु अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सचिन गायकवाड, महेश मसने, सुनिल गायकवाड, वैष्णवी भांगरे, अमोल सुतार, करण वरे, सागर कुंभार, सागर दळवी, मयुर दळवी, कुणाल कडू, आयुष वर्तक व लोणावळा ग्रामीण पोलीस, स्थानिक नागरिक यांनी शोधकार्यात मदत केली.
आत्महत्या केल्याचा संशय
दरम्यान ही तरूणी एकटीच इथे का आणि कशासाठी आली, या प्रश्नाचा शोध घेत असता, तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई