व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चावसर गावातील महिलांचा पाण्यासाठी संघर्ष ; ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

पवन मावळ भागातील चावसर या दुर्गम गावातील महिला भगिनींना पाण्यासाठी नित्यनेमाने संघर्ष करावा लागत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 20, 2025
in लोकल, ग्रामीण
Women in Chavasar village struggle for water Villagers angry against poor management of Gram Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळ भागातील चावसर या दुर्गम गावातील महिला भगिनींना पाण्यासाठी नित्यनेमाने संघर्ष करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांची फरफट होत असून पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे. पाणी नियोजन होत नसल्याने अखेर आता ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चावसर गावात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सध्या गावात प्रशासक राज असून गावचा कारभार हाती असणारे ग्रामसेवक देखील पाणीपुरवठ्याकडे लक्ष देत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक, प्रशासक व बीडीओ यांना निवेदन दिले असून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास वडगाव मावळ येथील पंचायत समिती कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • चावसर येथील महिला भगिनींनी यापूर्वीही पाण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु तत्कालीन गटविकासअधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनीही पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गावात पाणी सोडण्याच्या वेळा पाळल्या जात नसून मनमानी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत निवेदन दिले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी व्यवस्था करणारे कर्मचारी वेळेवर पाणी न सोडणे, चार चार दिवस पाणी न सोडणे, कधी कधी गावात पंधरा दिवस पाणी नसते, आम्ही पाणी का येत नाही? असे विचारले तर उडवा उडवीची उत्तरे देऊन पाणी येणार नाही असं सांगत असल्याचे तक्रार निवेदनात म्हचले आहे.

तसेच, आम्ही ग्रामस्थ मंडळी अशा प्रश्न उत्तरांना कंटाळलेला आहोत. गावात पाणी पुरवठा नित्य नेमाने होत नसल्याने गावातील महिलाना २ ते ४ किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. आमची अशी मागणी आहे की येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही पंचायत समिती वडगाव मावळ येथे कार्यालयात येऊन आंदोलन करणार आहोत, असे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे. याबाबत ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हलर दुर्घटनेत मावळ तालुक्यातील गुरुदास लोकरे यांचा दुर्दैवी मृत्यू ; दिवड गावावर शोककळा

Next Post

सांगवीतील एकवीस वर्षीय बेपत्ता तरूणीचा लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला मृतदेह । Lohgad Fort

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Body of 21 year old missing girl from Sangvi found at foot of Lohagad Fort

सांगवीतील एकवीस वर्षीय बेपत्ता तरूणीचा लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला मृतदेह । Lohgad Fort

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.