मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी इथे एका बंद खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून इथे वास्तव्यास होते अशी माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. ( Breaking Famous veteran Marathi actor Ravindra Mahajani died in Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी हे मागील 8 ते 9 महिन्यापासून आंबी (ता.मावळ) हद्दीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये राहत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. अंघोळ करून कपडे बदलत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सदर बाब समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. उद्या सकाळी नातेवाईक येणार आहेत.
मराठीतील दिग्गज नट काळाच्या पडद्याआड…
रवींद्र महाजनी यांनी हिंदी मराठी चित्रपटात अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत. त्यांचे देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, हळदी कुंकू असे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. तसेच दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील त्यांनी काम केले. अभिनेत्री रंजना, उषा नाईक व आशा काळे आदी दिग्गज अभिनेत्रींसोबत त्यांनी चित्रपट केले. “खेळ कुणाला दैवाचा कळला” या प्रसिद्ध गाण्यातील रवींद्र महाजनी कुणीही विसरू शकत नाही.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात पहिल्यांदाच 2 तहसीलदार; काले-कॉलनी व शिवणे मंडळमधील 60 गावांसाठी नवीन ‘अपर तहसीलदार’
– राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजितदादांनी बाजी मारली, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं? लगेच वाचा