महाराष्ट्राच्या इतिहासातील बला’त्काराची सर्वात कुप्रसिद्ध घटना असलेल्या अहमदनगर येथील कोपर्डी बला’त्कार आणि हत्या’कांड प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात आत्म’हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे हा पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. दरम्यान आरोपी पप्पू शिंदे याने आज रविवार (दिनांक 10 सप्टेंबर) रोजी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा मृतदेह ससून येथे पोस्टमार्टम साठी नेण्यात आला आहे. परंतू इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेलमध्ये आत्म’हत्या करतो, यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
संपूर्ण देशाला हादरवणारे कोपर्डी बलात्कार प्रकरण –
दिनांक 13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बला’त्कार आणि हत्याकांड घटनेच्या सव्वा वर्षांनंतर पीडितेला न्याय मिळाला होता. ह्या खटल्यात पीडितेची आई, बहीण व मैत्रिणीच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्राचे समाजमन ढवळून काढणार्या कोपर्डी बला’त्कार घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, सहआरोपी संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ भैलुमे यांना कोर्टाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती.
दरम्यान आरोपी पप्पु शिंदे हा कोपर्डी घटनेचा प्रमुख दोषी असून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज (रविवार, दिनांक 10 सप्टेंबर) रोजी सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना शिंदेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान आता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, तसेच पुढील तपास सुरु आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– पोलिसांची दबंग कामगिरी! लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद, एकाचवेळी दहा गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– मावळ तालुक्यात प्रथमच गावोगावी मोठ्या प्रमाणात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी