मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा इथे दोन मुले वाहून गेल्याची दुर्घटना आज, गुरुवार (दिनांक 24 ऑगस्ट) रोजी घडली. सकाळी 9 नंतर कुंडमळा इथे शेलार मळा भागात पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या चारपैकी दोन जण वाहून गेले तर दोन जण बचावले. मुले वाहून गेल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र आणि तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ( Breaking News Two children drowned in Kundmala Maval In Talegaon Dabhade Police Limit )
दिवसभर शोधकार्य केल्यानंतर संध्याकाळी 7 च्या सुमारास एका मुलाचे शव शोधण्यात शोध पथकाला यश मिळाले. पण दुसऱ्या मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही, त्याच्यासाठी उद्या पुन्हा एकदा शोधकार्य केले जाणार आहे. चिखली जाधववाडी येथील ही मुले कॉलेज बुडवून कुंडमळा इथे पर्यटन आणि जलविहाराचा आनंद घेण्यासाठी आली होती. चार पैकी दोन मुले वाचली, एक मुलगा अनिकेत वर्मा (वय 17) याचा मृतदेह शोधपथकाला सापडला आहे. तर, अशोक गुलाब चव्हाण (वय 17, चिंचवड – गेंडीभाई चोपडा हायस्कूल ज्युनियर कॅालेज) ह्याचा शोध लागला नसून उद्या त्याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सत्यवान माने यांनी दिली.
वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्र यांची टीम निलेश संपतराव गराडे, भास्कर माळी मामा, अनिल आंद्रे, गणेश ढोरे, गणेश निसाळ, विनय सावंत, गणेश गायकवाड, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, शुभम काकडे, निनाद काकडे, वैभव वाघ, सागर कुंभार, रतन सिंग, योगेश दळवी, सिध्देश निसाळ, महेश मसणे, सुनिल गायकवाड, राजेंद्र कडू, प्रशांत शेडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद निरंजन भेगडे, रियाज मुलानी, गणेश जावळेकर, शुभम काळोखे, धीरज शिंदे, अक्षय घोडेकर आणि तळेगाव दाभाडे पोलिस यांनी बचाव आणि शोधकार्यात सहभाग घेतला. ( Breaking News Two children drowned in Kundmala Maval In Talegaon Dabhade Police Limit )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सह्याद्रीचा दुर्गसेवक हरपला! अमित जाचक यांचे इंदुरीजवळ अपघाती निधन, मावळ तालुक्यातील युवावर्गावर शोककळा
– बाफना डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अध्यापनाचे प्रशिक्षण; इनरव्हील क्लबचा उपक्रम
– सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा