Dainik Maval News : मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील शेलारवाडी जवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना लोखंडी पूल कोसळला आहे. ह्या दुर्घटनेत अनेक पर्यटक नदीत पडले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्मन सुरू आहेत.
रविवार सुटीचा दिवस असल्याने कुंडमळा पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
गेली दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे. ( Bridge over Indrayani river collapses at Kundamala in Maval 25 to 30 tourists feared drowned )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News