व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : खासदार श्रीरंग बारणे

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 2, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, लोकल, शहर, शहर
budget that gives relief to workers women and common people said MP Shrirang Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. हा मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठा दिलासा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली असून ५० हजारांवरून एक लाख रुपये केले आहेत.

एससी, एसटीच्या महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना आणली जाणार आहे. पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या महिलांना दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळण्याची तरतूद केली जाणार आहे. ३६ जीवरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त केली आहेत. वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे स्वस्त होतील. गरीब, युवा, अन्नदाता व नारी या चार घटकांच्या प्रामुख्याने सक्षमीकरणावर भर दिला आहे.

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे. दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

  • केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी तीन प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क दहा टक्के कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे परदेशातून सोने आयात करणे दहा टक्के स्वस्त होईल.

सरकारने इंटरअॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील शुल्क दहा टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने घेवून जाणारा सर्वंकष असा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


Previous Post

शौचालयाचे बांधकाम दुसऱ्याला दिल्याने मजुराला बेदम मारहाण, सोमाटणे येथील प्रकार । Talegaon Dabhade News

Next Post

गहुंजे स्टेडियमवर झालेल्या भारत-इंग्लंड टी20 सामन्यातील तिकीटांचा काळाबाजार, तिघांना अटक । Dehu Road News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

गहुंजे स्टेडियमवर झालेल्या भारत-इंग्लंड टी20 सामन्यातील तिकीटांचा काळाबाजार, तिघांना अटक । Dehu Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

May 23, 2026
meeting held at Collectorate office regarding proposed MIDCs at Baur Brahmanwadi Karunj in maval MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

May 23, 2026
Adding to Maval historical heritage Ancient tunnel found at entrance of Visapur Fort research needed

मावळच्या ऐतिहासिक वारशात भर… विसापूर किल्ल्याच्या आडवाटेला आढळले प्राचीन भुयार, संशोधन होणं गरजेचं

May 23, 2026
house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.