पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. ( Bulldozers should be moved on illegal constructions related to drugs in Pune said CM Eknath Shinde )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाकडून राहुल गांधी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड । Congress MP Rahul Gandhi
– लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम अखेर सुरू । Lonavala News
– कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे यांना राज्यस्तरीय नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार । Karla News