धामणे गाव (ता. मावळ) येथे चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पांडुरंग वाघोजी गराडे (वय 53 वर्षे, व्य. किरणा दुकान, रा.धामणे ता मावळ) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात भादवी कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिनांक 25 मे सकाळी 6 ते दिनांक 27 मे सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ही चोरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे वरील काळात बाहेर गेले असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकुण 8 लाख 78 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शिरगाव पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. ( Burglary in Dhamane village goods worth nine lakhs were stolen )
अधिक वाचा –
– कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली… वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval
– महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश । Dehu Road Crime
– पवना धरणात 23.90 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल हे पाणी? वाचा अधिक । Pavana Dam Updates