केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (बुधवार, 18 जानेवारी) देशातील प्रमुख तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची आणि काही राज्यातील पोटनिवडणूकांची घोषणा केली. आयोगाने त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. त्याप्रमाणेच अनेक राज्यांतील पोटनिवडणूकांची घोषणा केली, यात महाराष्ट्रातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकांचाही समावेश आहे. ( By elections of Pimpri Chinchwad and Kasba Peth assembly constituencies )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कसबा पेठ मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर दोन्ही मतदरासंघांमधील जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांवर आता पोटनिवडणुका पार पडणार आहेत. या पोटनिवडणुकींसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. तर, पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. ( By elections of Pimpri Chinchwad and Kasba Peth assembly constituencies )
अधिक वाचा –
– माजी मंत्री बाळा भेगडे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनियुक्त 20 सदस्यांची संपूर्ण यादी
– मोठी बातमी! गौतम चाबुकस्वार यांची शिवसेना ठाकरे गटाच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
– मोठी बातमी! वंचित बहुजन महिला आघाडीची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका सिंग, पाहा संपूर्ण यादी