Dainik Maval News : राज्यातील स्वमालकीच्या 36 हजार 978 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा (सोलर सिस्टिम) संच देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सध्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा नाही अशा 36 हजार 978 केंद्रांना 1 किलो वॅट क्षमतेचे पारेषण विरहित (बॅटरीसह) सौर संच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. महाऊर्जामार्फत या संदर्भातील कार्यवाही होईल. अंगणवाडी केंद्रातील बालकांना शिक्षणाकरिता साहित्य देण्यात येते. अशावेळी वीज सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासाठी टप्प्याटप्प्याने येणाऱ्या 564 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
अधिक वाचा –
– सोमाटणे येथे अंमली पदार्थ जप्त, तरुणाला अटक । Talegaon Dabhade
– शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत असणार एक ‘योजनादूत’, इथे करा अर्ज
– वडगाव मावळ येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाबाबत आमदार सुनिल शेळके यांना निवेदन । Vadgaon Maval