व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरात महाविकासआघाडीने पेटवली संजोग वाघेरे यांच्या प्रचाराची ‘मशाल’ । Vadgaon Maval

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आता सरसावले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 29, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval Lok Sabha Candidate Sanjog Waghere Patil

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आता सरसावले आहेत. मविआकडून मावळ तालुक्यातील शहरे आणि गावागावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिन्ह अर्थात उमेदवार संजोग वाघेरे यांचे ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह पोहचवण्याचे काम सुरू आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळ शहरातील ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून मविआच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच वडगाव मावळ शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अतुल राऊत यांची प्रचार प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीत वडगाव शहरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. ( Campaigning of Maval Lok Sabha Candidate Sanjog Waghere Patil in Vadgaon Maval by MahaVikas Aghadi Workers )

महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वडगाव शहरातील बाजारपेठ आणि प्रत्येक विभागात जाऊन घरोघरी संजोग वाघेरे पाटील यांचे प्रचार प्रसिद्धीपत्रक वाटले. तसेच मावळच्या विकासासाठी मशाल चिन्ह लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना उ.बा.ठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस (आय) आणि मविआतील अन्य सहयोगी पक्षाचे पधाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार प्रमुख अतुल राऊत यांसह राष्ट्रवादी युवकअध्यक्ष विशाल वहिले, आबा चव्हाण, प्रतिमा हिरे, हनुमंत म्हाळस्कर, राहुल नखाते, आफताब सय्यद, अनिल ओव्हाळ, संतोष ढोरे, बाळासाहेब शिंदे, मनोहर फाटक, लक्ष्मण कुरकवाड, पंकज भामरे, संतोष शिंदे, मेरलीन मसी, राहील तांबोळी आदींनी प्रचारात सहभाग घेतला.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा : श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रीकसाठी मनसे मैदानात ! Maval Lok Sabha
– अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना तळेगाव-उर्से रस्त्यावर अटक; 2 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime
– लोणावळा जवळील शिलाटणे फाटा येथे भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार । Lonavala Accident


Previous Post

“…आता तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील” – संजय राऊत । Maval Lok Sabha

Next Post

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य – पाहा सुंदर फोटो

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य - पाहा सुंदर फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.