मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे निवडणूक लढवत आहेत. श्रीरंग बारणे यांची ही तिसरी निवडणूक आहे. यापुर्वी सलग दोनदा ते मावळ चे खासदार बनले आहेत. आता ते हॅटट्रीकसाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी महायुतीला बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच मतदारसंघात मनसे आपली ताकद महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभी करताना दिसत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील हे चित्र दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काही दिवसांपूर्वीच खोपोली (जि. रायगड) येथे मनसे पदाधिकाऱ्यांची प्रमुख बैठक झाली होती. या बैठकीला उमेदवार श्रीरंग बारणे यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई, अमित खोपकर, पदाधिकारी रणजीत शिरोळे, जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यांसह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नितीन सरदेसाई यांनी, ‘महाराष्ट्र सैनिकांसाठी राज साहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. त्यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीनिशी प्रचारात उतरेल,’ अशी ग्वाही दिली होती. ( Maval Lok Sabha MNS Working For Mahayuti Candidate Shrirang Barane Hat-trick Win )
ह्या पत्रकार परिषदेनंतर मावळ लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. मावळ तालुक्यात देखील मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वात मनसे बारणेंच्या हॅटट्रीकसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून रुपेश म्हाळसकर यांनी पदाधिकाऱ्यांसोबत ठिकठिकाणी बैठकांचा सपाटा लावला आहे. वडगाव, लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहूरोड आदी शहरात त्यांनी मनसैनिकांच्या गाठीभेटी घेऊन श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आणि विजयासाठी काम करण्याचे आवाहन तसेच सुचना केल्या आहेत.
अधिक वाचा –
– वडगावात आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत मावळ राष्ट्रवादी बुथ कमिटी मेळावा संपन्न, पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश । Maval Taluka NCP
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मागील आर्थिक वर्षात 23 कोटींची कर वसुली, वाचा कोणत्या विभागात किती टक्के वसूली । Talegaon Dabhade
– दुःखद ! मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबूराव धनवे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन । NCP Leader Aaburao Dhanve Passed Away