अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्यानंतर अल्पवयीन पत्नी पाच महिन्यांची गरोदर झाली. रुग्णालयात गेल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिला फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी 22 वर्षीय पतीला अटक केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी पासून ते दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा गुन्हा घडला. प्राप्त फिर्यादीवरुन दिनांक 13 जुलै 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ( Case Of Child Marriage Has Been Registered At Talegaon MIDC Police Station Maval Taluka )
महिला फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 कलम 9, 10, 11 बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 4, 5, (जे) (2), 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तसेच, 22 वर्षीय पतीला अटक करण्यात आली असून अन्य 4 जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे, ज्यात एका महिलेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही चार आरोपींनी आरोपी पती याच्यासोबत त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर पीडित मुलगी 5 महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये आढळुन आल्याने प्राप्त एमएलसी च्या जबाबावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा झिरो नंबरने दाखल होऊन गुन्ह्याच्या कागदपत्रावरून तळेगाव एमआयडीसी इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि अहिरे हे करत आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याला हादरवणाऱ्या ‘शिरगाव सरपंच हत्या’ प्रकरणी मोठी अपडेट! ‘त्या’ तीनही आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता
– मावळ तालुक्यात पहिल्यांदाच 2 तहसीलदार; काले-कॉलनी व शिवणे मंडळमधील 60 गावांसाठी नवीन ‘अपर तहसीलदार’