Dainik Maval News : शाळेच्या एचआर विभागात काम करणाऱ्या महिलेने कामगारांचे खच्चीकरण केले. त्यामुळे त्या महिलेला बडतर्फ करण्याचा निर्णय शाळेने घेतला. त्यानंतर एचआर महिलेने शाळेची बदनामी करीत शाळेचा लॅपटॉप शाळेला परत न करता विश्वासघात केला. हा प्रकार 1 डिसेंबर 2024 ते 30 मार्च 2025 या कालावधीत देहुगाव येथे घडला.
आलोककुमार ओबेरॉय (वय 42, रा. देहूगाव) यांनी रविवारी (दि.30) याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 38 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलोक कुमार हे अभंग इंग्लिश मीडियम स्कूल देहूगाव या शाळेचे संचालक आहेत.
शाळेमध्ये सदर महिला एचआर म्हणून काम करत होती. तिने शाळेत काम सुरू केल्यापासून कामावर उशिरा येणे, विनापरवाना गैरहजर राहणे, कामगारांचे मनोबल खच्चीकरण होईल असे वर्तन केले. त्यामुळे शाळा प्रशासनाने एचआर महिलेला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर महिलेने स्वतः राजीनामा दिला. शाळेची बदनामी होईल असे वर्तन केले. तसेच शाळेने दिलेला पंधरा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप शाळेला परत न करता विश्वासघात केला, असे फिर्यादीत नमुद आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade