व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप

संतोषभाऊ कडू यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 17, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Caste certificates were distributed to 95 tribal citizens under Adim Seva Abhiyan at Shilimb through MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आदिवासी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी विविध दाखले मिळविणे सुलभ व्हावे, याकरिता राबविण्यात येत असलेल्या आदिम सेवा अभियान अंतर्गत पवन मावळ विभागातील शिळींब येथे आज (दि. १७) ९५ आदिवासी नागरिकांना मोफत आदिवासी दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये मौजे शिळींब गाव, चावसर आणि मोरवे येथील आदिवासी समाजातील नागरिकांचा समावेश होता.

तसेच याप्रसंगी, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. उपाध्यक्ष संतोषभाऊ कडू यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, मावळ पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सुनिता मनोहर येवले, काले पं.स. गणाच्या सदस्या शैलाताई कालेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले.

याप्रसंगी मा. सरपंच मनोहर उर्फ मनोजभाऊ येवले, मा. सभापती संभाजी शिंदे (मावळ कृ.उ.बा.स.), मा. सभापती नंदू धनवे (मावळ कृ.उ.बा.स.), अंजली जांभूळकर (संचालिका, मावळ कृ.उ.बा.स.), सविताताई संतोष कडू, सिद्धांत कडू (सरपंच, ग्रु.ग्रा. शिळींब), एस.बी. तिडके (ग्रामसेवक, ग्रु.ग्रा. शिळींब), शहाजी कडू (संचालक. मा.ता.ख.वि.सं.), प्रविण चोरघे (सदस्य, ग्रु.ग्रा. शिळींब), अजित चौधरी, रुपेश सोनवणे, लालाभाऊ गोणते, मंगेश कालेकर, योगेश तुपे उपस्थित होते.

तसेच, गणपत पवार, लक्ष्मण केदारी, दत्ता केदारी, आत्माराम लायगुडे, गोरख जांभूळकर, जालिंदर ढमाले, आत्माराम शिंदे, नामदेव शिंदे, मधुकर कडू, मधुकर केदारी, भगवान दरेकर, मल्हारी आखाडे, गोरख धनवे, अक्षय धनवे, कुंडलिक राऊत, काळू उंबरकर, मंगेश शिंदे, शुभम दरेकर, गोरख गायकवाड, दिलीप शिंदे, लहू धनवे हेही मान्यवर उपस्थित होते.

“आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आदिम सेवा अभियानाद्वारे मावळमधील हजारो आदिवासी बांधवांना आजवर जातीचे दाखले मिळाले, असून त्याद्वारे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येत आहे.” अशी प्रतिक्रिया संतोष राऊत यांनी दिली. तसेच, नागरी सत्काराला उत्तर देताना, “या भागाच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते सर्वकाही करणार असून विविध योजनांची अंमलबजावणी, विकासकामांची पूर्तता करणार असल्याचेही” संतोष राऊत यांनी सांगितले.

सभापती सुनिता मनोहर येवले यांनी नागरी सत्काराबद्दल उपस्थितांचे आभार मानले. तसेच, “मावळ पंचायत समितीच्या माध्यमातून आगामी काळात शासनाच्या योजना आणि निधीच्या माध्यमातून या भागाच्या विकासात योगदान देणार” असल्याचा विश्वास दिला. शैलाताई कालेकर यांनी, “मतदार बंधूभगिनी यांनी मतदानातून दाखविलेला विश्वास आणि सत्कारातून दाखविलेले प्रेम यातून उतराई होण्यासाठी या भागाच्या विकासात योगदान देणार, विविध योजनांची अंमलबजावणी करणार” असे सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजक असलेले संतोषभाऊ कडू यांनी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आदिम सेवा अभियान राबविण्यात आल्याचे सांगितले. तसेच, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांच्याकडून या भागाच्या विकासकामांसाठी विशेष निधी देण्याची मागणी केली. पत्रकार विशाल कुंभार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. याप्रसंगी आदिवासी बांधव, शिळींब ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण
– राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात


Previous Post

गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

Next Post

मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात उद्घाटन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
The equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj was inaugurated in Malwandi Thule

मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
Dharmaveer Balidan Mas observed by Shambhu devotees in villages of Maval taluka

मावळ तालुक्यातील गावागावांत शंभूभक्तांकडून ‘धर्मवीर बलिदान मास’चे पालन

March 17, 2026
The equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj was inaugurated in Malwandi Thule

मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात उद्घाटन

March 17, 2026
Caste certificates were distributed to 95 tribal citizens under Adim Seva Abhiyan at Shilimb through MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप

March 17, 2026
Dnyaneshwari lost her life due to mistake by tempo driver transporting gas cylinders incident at Somatane Phata Maval

गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

March 17, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.