सोमवार (14 नोव्हेंबर) रोजी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कार घोषित करण्यात आले. यामध्ये क्रीडा क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना जाहीर करण्यात आला. बुधवारी (16 नोव्हेंबर) रायगडचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद रायगड डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सुमा सिद्धार्थ शिरूर यांचा सन्मान करण्यात आला. ( Central Government Announced Dronacharya Award To Suma Shirur From Raigad District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रायगड जिल्हा क्रीडा परिषद, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सुमा शिरूर यांचा सन्मान केला. लक्ष शूटिंग क्लब येथे हा सन्मान सोहळा पार पडला. या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी, माणगाव राजेंद्र अतनुर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती मनीषा मानकर, पनवेल महानगरपालिका क्रीडा समन्वयक समीर रेवाळे आदी उपस्थित होते.
View this post on Instagram
“पॅरा शूटिंग” या खेळ प्रकारात क्रीडा मार्गदर्शन केले असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर.. (1/2)#DronacharyaAward #Raigad pic.twitter.com/EDTf9Jt959
— Raigad District Collector (@CollectorRaigad) November 15, 2022
सुमा शिरूर या रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथे राहतात. यापूर्वी त्यांना 2003 साली त्यांना केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला होता. सोमवारी त्यांना जाहीर करण्यात आलेला द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन याठिकाणी देण्यात येईल.
अधिक वाचा –
– 75 बाईकर्स, 75 दिवस आणि 34 राज्ये, काय आहे फ्रिडम रायडर बाईक रॅली? जाणून घ्या सविस्तर
– देव तारी त्याला कोण मारी! एका ड्रायव्हरच्या समयसुचकतेमुळे वाचला दुसऱ्या ड्रायव्हरचा जीव, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटना