मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यस्तरीय नेतृत्व करणारे आणि लढा उभारणे मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तसेच या काळात ‘गाव तिथे साखळी उपोषण’ करण्याची हाक मराठा बांधवांना दिली. त्यानुसार मनोज जरांगे पाटलांच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील अनेक गावात मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळ खंडाळा इथेही दिनांक 1 डिसेंबरपासून मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. दिनांक 1 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत साखळी उपोषणाला मावळ तालुक्यातील लोणावळा आणि ग्रामीण परिसरात दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळतोय. खंडाळा विभागात मागील 14 दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) तर या उपोषणाला महिला वर्गाचाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ( chain hunger strike by Maratha community at Khandala as per Manoj Jarange Patil call )
साखळी उपोषणात रमेश सपकाळ, रवी कचरे, सुमन देवकर, आदिनाथ खानट, साई सपकाळ यांच्यासह महिला प्रतिनिधी आशा वसंत खराडे, शुभांगी गणेश कदम, नीता मच्छिंद्र खराडे, अश्विनी सचिन सपकाळ, राणी प्रकाश मातेरे, रसिका भावेश खराडे, सुनिता सुरेश मातेरे, शशिकला चंद्रकांत सपकाळ, आदिती प्रकाश मातेरे, पुनम गणेश सावंत, उमेशा संदीप सपकाळ आदी भगिनी सहभागी झाल्या होत्या.
अधिक वाचा –
– भाजपाच्या नवमतदार नोंदणी अभियानाला व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Lonavla News
– लोणावळ्यात युवक राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर; 102 बाटल्या रक्त संकलित
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ पुन्हा ब्लॉक; ‘या’ काळात मुंबई लेन राहणार बंद, पाहा वाहतुकीचे नियोजन